लखपती दीदी योजना मराठी
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेगवेगळ्या योजना असलेला अर्थसंकल्प समोर आणला. यामध्ये त्यांनी सांगितले की, आमचे सरकार सामान्य माणूस, महिला, गरीब, शेतकरी आणि तरुण यांच्या प्रश्नांवर विशेष लक्ष देत आहे. त्यांनी त्यांच्या भाषणात लखपती दीदी योजनेचा उल्लेख केला. या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी म्हटले की, या योजनेचे उद्दिष्ट आम्ही 2 कोटींवरून आता 3 कोटी केले. महिलांना आर्थिक दृष्ट्या चांगली मदत करण्यासाठी ही स्कीम चालू केली आहे. लखपती दीदी योजना मराठीमध्ये (Lakhpati Didi Yojana In Marathi) आम्ही तुम्हाला येथे समजावून सांगणार आहोत आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सुद्धा माहिती देणार आहोत.
नक्की काय आहे लखपती दीदी योजना?
दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी महिलांना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी या स्कीमची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत स्त्रीयांना बचत गटांमार्फत प्रशिक्षण देऊन लघु उद्योग चालू करण्यासाठी प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट या स्कीमचे आहे. त्यांना या ट्रेनिंगमध्ये एलईडी बल्ब बनवणे, प्लंबिंग आणि इतर कौशल्यांचा समावेश आहे. आता जास्तीतजास्त स्त्रियांना याचा लाभ घेता यावा यासाठी तीन कोटी लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
लखपती दीदी योजनासाठी पात्रता
या योजनेसाठी कुठलीही वयाची अट नाही. भारताची रहिवासी असलेली प्रत्येक स्त्री याचा लाभ घेऊ शकते. त्यांना यासाठी बचत गटाचे सदस्य व्हावे लागेल.
लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत
- बचत गटाची सदस्य झाल्यानंतर त्यांना अंगणवाडी मधून या स्कीमचा फॉर्म घेणे अनिवार्य आहे.
- तिथे तुम्हाला फॉर्मबद्दल सर्व माहिती दिली जाईल.
- त्यानंतर संपूर्ण अर्ज त्या केंद्रावर सबमिट करा.
- अर्ज पुढे गेल्यानंतर त्याची सर्व पडताळणी केली जाईल.
- हा अर्ज मंजूर झाल्याची बातमी तुम्हाला मेसेज किंवा ईमेल द्वारे कळवली जाईल.
- तुम्हाला पाहिजे असल्यास 5 लाखांचे बिनव्याजी कर्जही उपलब्ध करून देण्यात येते.
लागणारी कागदपत्रे
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- बँक अकाउंट माहिती
- पॅन कार्ड
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
लखपती दीदी योजनाचे फायदे
- त्या क्षेत्रातील तज्ञांकडून चांगले प्रशिक्षण मिळेल.
- नवीन व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन भेटते.
- शेती आणि सिंचनाच्या कामासाठी ड्रोनचा वापर करण्याचे प्रशिक्षण भेटते.
- बिनव्याजी कर्ज, आर्थिक साक्षरता, आत्मविश्वास आणि यांसारखे बरेच फायदे मिळतात.
या लेखात lakhpati didi Yojana in Marathi बद्दल सर्व माहिती भेटली असेल अशी आशा करतो. तसेच इतरांनाही ही माहिती मिळावी म्हणून तुमच्या ग्रुपवर आणि सोशल मीडियावर नक्कीच शेअर करा.
आता केंद्र सरकारकडून Bharat Rice मिळणार फक्त 29 रुपये किलोमध्ये