Capital small finance Bank IPO बद्दल माहिती

Capital small finance Bank IPO

शेअर बाजारामध्ये Capital small finance Bank IPO 7 फेब्रुवारी पासून सर्वांसाठी खुला झालेला आहे. कंपनीचे उद्दिष्ट यातून 523 कोटी रुपये उभारण्याचे आहे. ही एक छोटी फायनान्स बँक आहे. 1999 मध्ये पंजाबच्या जलंधरमध्ये स्थापना करण्यात आली होती. एसएफबी लायसन्स मिळवणारी ही पहिली नॉन NBFC मायक्रो फायनान्स संस्था आहे.

त्यांचे मुख्य टार्गेट हे मिडल इन्कम असणारे कस्टमर आहेत. त्यामुळे त्यांचा ग्रामीण आणि छोट्या शहरांमध्ये बिजनेस मोठ्या प्रमाणात चालतो. उत्तर भारतातील हरयाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, चंदीगढ आणि हिमाचल प्रदेशमध्ये त्यांचे विशेष कार्य चालते.

कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक आयपीओ डिटेल्स

capital small finance bank ipo details

महत्त्वाच्या डेट्स

7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान अर्जदारांसाठी हा आयपीओ खुला असेल. त्यानंतर अलॉटमेंट 12 तारखेला जाहीर केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रिफंड आणि डिमॅट मध्ये शेअर्स दिले जातील. 14 फेब्रुवारीला आपल्याला NSE आणि BSE वर हा स्टॉक ट्रेड करताना दिसेल.

लॉट साइज आणि किंमत

एका लॉटमध्ये 32 शेअर्स दिले जाणार आहेत. यात सगळ्यांची किंमत 14,976 रुपये ठेवली आहे. रिटेलला जास्तीतजास्त 13 लॉटला अर्ज करण्याची मुभा असेल.

प्राईस बँड

445 ते 468 रुपये हा प्राइस बँड निश्चित करण्यात आलेला आहे. फेस व्हॅल्यू दहा रुपये प्रति शेअर ठेवली गेलेली आहे.

इशू साइज

11,176,713 शेअर्स मार्केटमध्ये आणले जाणार आहेत. यातून 523 कोटींपेक्षा जास्त रुपये उभारले जाणार आहेत.

प्रमोटर्स

अमरजीत सिंग समरा, सर्वजितसिंग समरा, नवनीत कौर समरा, दिनेश गुप्ता आणि सुरींदर कौर समरा यांचा प्रमोटर्स मध्ये समावेश आहे.

Capital small finance Bank IPO Gmp

या स्टॉकचा ग्रे मार्केटमध्ये 43 रुपयांचा प्रीमियम चालू आहे. हा प्रीमियम जर लिस्टिंगच्या दिवसापर्यंत असाच राहिला तर 9 टक्के रिटर्न्स भेटू शकतात.

Capital small finance Bank IPO Review

एसएमसी ग्लोबल, सुशील फायनान्स आणि मारवाडी फायनान्शिअल सर्विसेसकडून सबस्क्राईब असा टॅग देण्यात आलेला आहे.

इतर माहिती

भारतातील 5 राज्यांसह एका युनियन टेरिटरीमध्ये त्यांच्या 172 ब्रांच आणि 174 एटीएम आहेत. त्यांच्याकडे 1827 कर्मचारी कामाला आहेत. FY22-23 मध्ये त्यांचा रेव्हेन्यू 14.72 टक्क्यांनी आणि प्रॉफिट 49.59 टक्क्यांनी वाढला होता.

Apeejay Surrendra Park Hotels IPO

1 thought on “Capital small finance Bank IPO बद्दल माहिती”

  1. Pingback: अबब! Entero Healthcare Solutions IPO मधून उभारणार 1600 कोटी रुपये - Nationdaily.in

Comments are closed.

Scroll to Top