LIC stake in HDFC Bank: आरबीआयच्या सल्ल्यानुसार एलआयसी एचडीएफसी बँकेमध्ये 9.99% हिस्सेदारी खरेदी करणार आहे. ही सर्व प्रक्रिया 24 जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे.
भारतातील एक नंबरची प्रायव्हेट बँक म्हणून एचडीएफसी बँकेला ओळखले जाते. त्यांच्याकडे सर्वात जास्त ग्राहक आहेत. एलआयसी भारत सरकारची सगळ्यात जास्त प्रॉफिटमध्ये असलेली कंपनी आहे. बऱ्याचशा बँकांमध्ये ते शेअर होल्डर आहेत. आता त्यांनी सगळ्यात मोठ्या प्रायव्हेट लेंडरमध्ये त्यांची हिस्सेदारी वाढवण्याचे ठरवले आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला LIC stake in HDFC Bank बद्दल सर्व माहिती देण्याचे काम करू.
LIC stake in HDFC Bank ची सविस्तर माहिती
काही दिवसांपूर्वी एलआयसी ने बँकेमध्ये 9.99% हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून मंजुरी देण्यात आलेली आहे. ही मंजुरी जरी देण्यात आली असली तरी बँकेने यावर प्रतिक्रिया दिली आहे की, एलआयसी ने 9.99% पेक्षा जास्त हिस्सेदारी वाढवू नये.
त्यांचे रिझल्ट खराब आल्यामुळे सध्या त्यांच्या शेअर्समध्ये पडझड होत आहे. ही बातमी बाहेर आल्यानंतर सुद्धा या सर्वात मोठ्या प्रायव्हेट लेंडरचे स्टॉकस् कोसळतच होते. आतापर्यंत जवळपास 14% यात घसरण पाहायला मिळालेली आहे.
9.99% पर्यंत LIC stake in HDFC Bank वाढवण्याअगोदर त्यांच्याकडे 5.19% एवढी हिस्सेदारी आहे. या 5.19% इक्विटी शेअर्सची किंमत जवळपास 49,000 कोटी रुपये आहे.
त्यांचे रिझल्ट जरी खराब आलेले होते तरीही 31 डिसेंबर 2023 या क्वार्टरमध्ये त्यांचा महसूल 25.8% वाढला होता.
HDFCBANK – Something Good 🤝 pic.twitter.com/okgnltVGg8
— CA Vivek Khatri (@CaVivekkhatri) January 26, 2024
व्याज देण्याचे प्रमाण घटले
त्यांचे व्याज देण्याचे प्रमाण 3.65 टक्क्यावरून 3.4 टक्क्यांवरती घसरले आहे. जेव्हा बँकेमध्ये एचडीएफसीला विलीन करण्यात आले होते, तेव्हा हे प्रमाण 4 टक्क्यांवर होते. याचा सर्वात जास्त परिणाम त्यांच्या अर्नींग रिझल्ट मध्ये दिसला. याचा फटका त्यांना बसताना दिसत आहे. त्यांच्या मार्केट कॅपमध्ये जवळपास 11 लाख कोटींची घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.
चांगली बातमी
भारतातील सर्वात मोठी लाइफ इन्शुरन्स कंपनी मोठी शेअर होल्डर बनणार असल्यामुळे गुंतवणूकदारांना थोडा दिलासा मिळालेला आहे. गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देण्यात त्यांचे कायमच योगदान राहिले आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा यात उसळी पाहायला नक्कीच मिळेल. अशाच चांगल्या बातम्या पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Comments are closed.