एफडी करण्याचा विचार करताय? या 7 Small finance Bank FD rates देत आहेत 8 टक्के पेक्षा जास्त

Small finance Bank FD rates: सर्वात जास्त सुरक्षित गुंतवणूक एफडीला मानले जाते. या मुदत ठेवी सामान्य माणसाच्या पहिल्या पसंती असतात. बऱ्याचशा बँका खूप कमी एफडी रेट्स देतात, त्यामुळे दुसरे पर्याय शोधण्यात लोक कायम व्यस्त असतात. अशाच लोकांसाठी या सात Small finance Bank FD rates जास्त देत आहेत. त्यांची सविस्तर माहिती तुम्हाला खालील प्रमाणे भेटेल.

Small finance Bank FD rates

Small finance Bank FD rates in marathi

ESAF स्मॉल फायनान्स बँक

यांच्याकडून 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतच्या ठेवींवरती 4% ते 8. 25% व्याज देण्याचे काम सुरू आहे. 21 ऑगस्ट 2023 नंतर 444 पर्यंत असलेल्या एफडींवर 8.50% व्याज दिले जाते.

एयु स्मॉल फायनान्स बँक

सात दिवस ते दहा वर्ष या काळात गुंतवणूक करायची असेल तर 3.75% पासून 8% पर्यंत सुद्धा व्याज दिले जाते. आठ टक्के हे 18 महिन्यांमध्ये पूर्णपणे परिपक्व झालेल्या फिक्स डिपॉझिटवर दिले जाते. ही योजना 2024 च्या जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आलेली आहे.

उज्जीवन

यांच्याकडून सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीत फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांना 8.25 टक्क्यांपर्यंत व्याजदर भेटू शकतो. 1 जून 2023 पासून लागू झालेल्या या दरात जे ग्राहक 560 दिवसांपर्यंत मुदत ठेवी करतील, त्यांना 8.25 टक्क्यांचा व्याजदर भेटेल.

इक्विटास

इक्विटासमध्ये 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या कार्यकाळात 3.5% ते 8.50% व्याजदर दिला जाणार आहे. त्यांच्याकडून 8.50% व्याजदर 444 दिवसांमध्ये परिपक्व झालेल्या एफडींवर असणार आहे. हे नवीन रेट्स 21 ऑगस्ट 2023 या तारखेपासून लागू करण्यात आले आहेत.

जन स्मॉल फायनान्स बँक

Jana small finance Bank FD rates हे सात दिवसांपासून ते दहा वर्षांच्या ठेवींवरती तीन टक्के पासून ते 8.50% पर्यंत दिले जातात. परिपक्व होण्यासाठी 365 दिवस लागतात आणि त्यावर दोन जानेवारी 2024 पासून जास्तीत जास्त 8.50% व्याज मिळू शकते.

फिनकेअर

सर्वांसारखाच त्यांचा कालावधी सुद्धा सारखाच आहे. फक्त कमाल व्याज हे 8.61% आहे. हे मिळवण्यासाठी 750 दिवस जावे लागतात. मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून हे दर लागू झालेले आहेत.

सूर्योदय

यांच्याकडून सर्वात जास्त फिक्स डिपॉझिटवर परतावा भेटतो आहे. दोन वर्षांनी आणि दोन दिवसांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवींवर 8.65% परतावा भेटू शकतो. याची अंमलबजावणी त्यांनी 22 डिसेंबर 2023 पासून सुरू केली आहे.

Paytm Fastag Porting करायच आहे का? मग या स्टेप्स फॉलो करा

Scroll to Top